loader
Breaking News
Breaking News
Foto

नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

सावंतवाडी - ​सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि महिलांचा गौरव करण्यात आला. ​​कार्यक्रमानिमित्त २८ एप्रिल २०२६ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. यामध्ये ​पहिली ते चौथी गट: प्रथम- युवराज जाधव, द्वितीय- रुद्र जाधव, तृतीय- श्रेयानवियशिका सोनुलेकर.​पाचवी ते सातवी गट: प्रथम- विघ्नेश जाधव, द्वितीय- आरोही गावकर, तृतीय- ईशा मालपेकर. ​आठवी ते दहावी गट: प्रथम- चैतन्या गावकर, द्वितीय- दुर्वा कदम, तृतीय- शमिका मालपेकर. ​महिलांसाठी आयोजित ‘पदर’ रमाईचा २०२६ या प्रबोधनात्मक कार्यक्रमात खेळ पैठणी स्पर्धा घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यात अनुष्का जाधव (प्रथम), शमिका पाडलोसकर (द्वितीय) आणि संजीवनी जाधव (तृतीय) यांनी पैठणी जिंकून मान मिळवला. ​​मंडळातर्फे आयोजित 'जयभीम रिल्स स्टार स्पर्धा २०२६' मध्ये अभिषेक अवटी-आरोस (प्रथम), रोहित जाधव-तळवडे (द्वितीय) आणि रोहन कदम-कांदळगाव (तृतीय) यांनी बाजी मारली. त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच 'भीमगीत गायन' स्पर्धेत प्रज्ञा सूर्य ग्रुप-आसोली (प्रथम), पंचशील महिला समूह-सरमळे (द्वितीय) आणि रमाई कलाविष्कार-मडुरे (तृतीय) यांनी यश संपादन केले. २९ एप्रिल रोजी बुद्ध पूजा पाठ व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते महेंद्र मातोंडकर यांनी "संविधान आमचा प्राण" या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले, ज्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टाइम्स स्पेशल

या सोहळ्यात उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये माय माऊली मंडळाचे अध्यक्ष नागेश गावकर, नवयुवक कला क्रीडा मंडळा सोनुर्ली पाक्याचीवाडीचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, माऊली दशावतार मंडळाचे संचालक दाजी गावकर, नवनियुक्त सभापती सुस्मिता जाधव, आणि वैदही जाधव यांचा समावेश होता. या ​अभिवादन सभेला सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, नागेश गावकर, सतीश सोनुर्लेकर, लक्ष्मीदास ठाकूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चोख बजावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg