loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात रस्ता ओलांडणाऱ्या ३० वर्षीय महिलेला टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माजिवडा परिसरात घडली. टेम्पो चालकाच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत भरधाव वेगाने वाहन चालवून टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत मृत झालेली महिला रेणुका क्रांतीलाल चव्हाण(३०) रा. मुंब्रा या ठाण्याच्या रुतमजी परिसरात हाऊसकिपिंगचे काम करत होत्या. सायंकाळी सुमारे ५.२६ वाजता गणेश यांना त्यांचा चुलत भाऊ आकाश राठोड याचा फोन आला. रेणुका ही माजिवाडा येथील नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर रस्ता ओलांडत असताना भरधाव टेम्पो चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत तिला जोरदार धडक दिली. त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच मृतक रेणुका यांचा चुलत भाऊ गणेश पोमा राठोड (२५) रा. शैलेश नगर मुंब्रा याने दिलेल्या तक्रारीनुसार कापूरबावडी पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg