loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्हापूर शाहूवाडी येथील हमालांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - हल्ली माणसातील माणुसकी आणि प्रामाणिकपणा राहिला नसल्याचे बोलले जाते. मात्र हातावर पोट असणा-या आणि गाडीवर हमाली म्हणून नोकरी करणा-या हमालांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना सलामच आहे! अशा प्रामाणिक व्यक्तिमुळे प्रामाणिकपणा टिकून आहे. इतरांनी आदर्श घेण्यासारखा ठरला आहे. लांजातील कोंडगे गावचे सरपंच डॉ.एस.व्ही.कदम यांची रोख पंचवीस हजार आणि सर्व महत्वाची कागदपत्र असणारी बॅग हरवली होती. कोल्हापूर शाहूवाडी येथील संदीप सावरे, नामदेव खामकर, पांडुरंग पोवार या हमालांनी कदम यांना बॅग पोच केली. या हमालांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोंडगे गावचे सरपंच डॉ.एस.व्ही.कदम हे आपल्या कोंडगे गावातून २६ मे रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लांजाला यायला निघाले होते.चार चाकी गाडीच्या डीकी मध्ये सामान ठेवतेवेळी एक महत्त्वाची कागदपत्र गाडीचे विमा पॉलिसी, आरसी बुक ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, एटीएम कार्ड आणि रोख रुपये २५००० असलेली छोटी बॅग गाडीच्या टपावरती ठेवली होती ती घेण्यासाठी कदम विसरून गेले आणि गाडी स्टार्ट करून लांजाला निघाले असता गाडीवरील बॅग कोंडगे येथील रस्त्यावर पडली गेली. हे डॉ.कदम यांना माहीत नाही. रात्री १० वाजता कोल्हापूरहून कदम यांना फोन आला आणि तुमची बॅग आम्हाला कोंडगे येथील रस्त्यामध्ये पडलेली मिळाली आहे. आमची ट्रान्सपोर्ट गाडी लांजाहून कोंडगे अनुस्कुरा मार्गे कोल्हापूरला आम्ही आलो आहोत. येथे आल्यानंतर आपली बॅग तपासली असता नंबर मिळाला. आम्ही दुसरी ट्रान्सपोर्टची गाडी घेऊन साखरपा येथे २७ मे रोजी येत असल्याचे सांगितले. बॅग मधील एकही वस्तू इकडे तिकडे न करता हमालांनी डॉ एस.व्ही. कदम यांना बॅग सुखरूप सुपूर्द केली. कदम यांनी हमालांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले तसेच त्यांना बक्षिस ही दिले. माणुसकी हरवलेल्या आजकालच्या दुनियेत मजुरांचा प्रामाणिकपणा पाहून डॉ.कदम भारवून गेले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg