loader
Breaking News
Breaking News
Foto

मुळगांव उपकेंद्रातील तांत्रिक बिघाड लवकर दुरुस्त होणार; महावितरणची ग्वाही

संगलट खेड (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील मुळगांव येथील महावितरणच्या उपकेंद्रात येणा-या खाडीपट्टयातील पन्हाळजे, बहिरवली, सवणस, आमशेत, चौगुले मोहल्ला, तांबे मोहल्ला, रजवेल, कर्जी, शिर्शी, आमशेत, मुंबके, संगलट, खारी, नांदगाव, शिरवली, दयाळ, तळघर आदि खाडीपट्टयातील गावांमध्ये मुळगांव येथील महावितणच्या उपकेंद्रात सततच्या होणा-या तांत्रिक दोषामुळे विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर सलीम तांबे, दाऊद हमदुले, अख्तर सुर्वे, हशमत परकार, मोहम्मद हमदुले, रहमान परकार, महेश बुरटे, मुजीब नाडकर, जुल्फिकार नाडकर, नगरसेवक चौगुले, मुजफ्फर सरगुरु, अराफत कादीरी, हनीफ नांदगावकर, अशरफ तांबे, इब्राहिम हमदुले, फैज हमदुले आदिंनी महावितरण कंपनीचे अधिकारी उपअभियंता विलनकर, बडगुजर यांनी भेट घेऊन खाडीपट्टयातील खंडीत विज पुरवठाबाबत चर्चा करून नाराजी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर अधिकाऱ्यांनी वर नमुद ग्रामस्थाजवळ संवाद साधत खाडीपट्टयातील खंडीत विज पुरवठाबाबत सविस्तर चर्चा करुन खंडीत विजपुरवठामध्ये येणारा तांत्रिक दोष लवकरात लवकर दुर करून विज पुरवठा सुरळीत सुरु करण्यात वा भविष्यात खंडीत विज पुरवण्याचा प्रकार पावसाळ्यात घडत नये, याची खबरदारी घेतली जाईल. तसेच खाडीपट्टयातील ग्रामस्थांची गैरसोय निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेऊन विज पुरवठा सुरळीत सुरु करण्याकडे लक्ष्य दिले जाईल. तसेच पावसाळ्यात दुरुस्ती देखभाल करताना विज पुरवठा खंडित करावा लागतो. असेही यावेळी उपस्थित अधिका-यांनी शिष्टमंडळाच्या निदर्शनास आणून दिले. तर शिष्टमंडळातील ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय सुसंवाद साधला जाईल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

टाईम्स स्पेशल

अशा प्रकारे खाडीपट्टयातील विज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारावर खेळीमेळीच्या वातावरणात अधिकारी व ग्रामस्थांच्या मध्ये सभा पार पडली. मात्र तरीही खाडीपट्टयात वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला नाही तर मग आम्हांला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल याची दखल घेऊन खाडीपट्टयात विज पुरवठा सुरळीत सुरु करावा. हीच अपेक्षा चर्चेच्या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg