loader
Breaking News
Breaking News
Foto

कारची स्कूटरला ठोकर; वार्डबॉय गंभीर जखमी, पोलादपूर ग्रामीण रूग्णालयासमोरच अपघात

संगलट खेड (इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा महामार्गावरील ग्रामीण रुग्णालयासमोर दुचाकीस्वार वार्डबॉय तरुणास कारची पाठीमागून ठोकर लागून वार्डबॉय गंभीर जखमी झाला. किरण गौतम बाविस्कर (वय २२ वर्षे) हा वार्डबॉय एक्टिवा (क्र. एमएच ०८ बीजे ९७२४) घेऊन महामार्गावरून पोलादपूर दिशेने कामानिमित्त जात असताना त्याचदरम्यान पाठीमागून मुंबई बाजूकडून महाबळेश्वरकडे जाणारी महिंद्रा मरांझो कार (क्र. जीजे २९ टी ७०७६) चालक हर्ष दिनेशकुमार पटेल वय २१ यांनी अतिवेगाने कार चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरच्या दुचाकीला पाठीमागून ठोकर देवून अपघात केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात दुचाकीस्वार वार्डबॉयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी महाड येथे पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलीस व कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, पोलीस हवालदार राजन माजलकर, कृष्णा चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg