loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रस्तावित 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन काय‌द्याला' खेड तालुक्यातील देवस्थानांचा विरोध

(खेड) - विकासाच्या आणि पुजारी, वहिवाटदार व मिरासदार यांना न्याय देण्याच्या नावाखाली मंदिरांच्या जमिनी बळकावण्याचा आणि त्या भूमाफियांच्या घशात घालण्याचा हा डाव तर नाही ना ? अशी रास्त शंका हिंदू समाजाला येत आहे. राजकारणी आणि बिल्डरांचे साटेलोटे जगजाहीर असून, विकासाच्या नावाखाली मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शेकडो कोटींच्या देवस्थान जमिनी हडप करण्यासाठी हे धोरण आखले जात आहे का? हा निर्णय मंदिरांचे अस्तित्व मुळापासून संपवणारा ठरू शकतो. यास्तव या प्रस्तावित कायद्याला देवस्थानांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे प्रस्तावित कायदा शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी देवस्थानांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि तालुक्यातील विविध देवस्थानांच्या वतीने खेडचे तहसीलदार संतोष सोनवणे यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी खारी येथील श्री हनुमान मंदिराचे विनोद बहुतुले, सुसेरी येथील श्री खेमनाथ देवस्थानचे प्रभाकर दिवाळे, श्रीधर गवळी, दीपक भांबड, कोरेगाव येथील श्री देव धावजी बाबा काळकाई देवस्थानचे प्रकाश मोरे, चोरवणे गावठाण येथील श्री रामवरदायिनी देवस्थानचे प्रवीण सावंत, श्री मांडवे येथील श्री भैरी जोगेश्वरी देवस्थानचे सुरेश मोरे, वरवली येथील श्री सोमजाई देवस्थानचे संतोष यादव, जैतापूर येथील श्री चंडकाई देवस्थानचे दुर्गेश शेलार, बिजघर येथील श्री शंकर पार्वती काळकाई देवस्थानचे सुनील भोसले, पुजारी भगवान जंगम, घोगरे देवस्थान चे संजय जाधव, अधिवक्ता हेमंत वडके, धर्मप्रेमी विनय माळी, हिंदू जनजागृती समितीचे विलास भुवड, सनातन संस्थेच्या स्नेहल तोडकरी, मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक सुरेश शिंदे यांचेसह अनेक विश्वस्त उपस्थित होते. या निवेदनावर चिंचघर वेताळवाडीचे अध्यक्ष प्रकाश कदम, बबन सुर्वे, श्री देवी पाथरजाई देवस्थानचे विनोद पाटणे, श्री स्वामी समर्थ मंदिराचे शैलेश धारिया, श्री महाकाली देवस्थानचे मनोज कवळे, नांदगाव येथील प्रकाश जगदाळे, सुसेरीचे मंगेश धाडवे यांनी सह्या करून सहभाग दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

खेड तहसीलदारांना निवेदन सादर

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg