loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट; १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १२ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रणव सुरेश येसरे असे या जखमी मुलाचे नाव असून, त्याला तातडीने कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला सांगली येथे हलवण्यात आले आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वानपथकाच्या मदतीने परिसरात कसून शोधमोहीम राबवण्यात येत असून, पोलिसांनी ग्रामस्थांची चौकशी सुरू केली आहे. रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात हा गावठी बॉम्ब ठेवण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे. हा बॉम्ब नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता, याचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg