loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील वारंवार वीज खंडित होण्याविरोधात नागरिक आक्रमक; महावितरण कार्यालयात निवेदन देणार

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुका हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा तालुका मानला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक दापोलीतील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे तसेच स्थानिक व्यवसायांचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यावसायिक तसेच पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सततच्या वीज खंडित होण्यामुळे हॉटेल व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, फळ प्रक्रिया उद्योग, दुकानदार तसेच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. विशेषतः पर्यटन हंगामात अशा प्रकारच्या समस्येमुळे दापोलीच्या पर्यटन प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील सर्व पर्यटन व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक तसेच नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालय, दापोली येथे निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

आपल्या मागण्या आणि समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता महावितरण कार्यालय, दापोली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या भविष्यांसाठी या घोषवाक्यासह नागरिकांनी एकजुटीने उपस्थित राहून प्रशासनाला जाब विचारण्याची भूमिका घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg