खेर्डी चिपळूण (संतोष पिलके) : नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या “इंटरनॅशनल डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६” स्पर्धेत चिपळूण येथील डायडाज डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारतासाठी तब्बल सात सुवर्णपदके व एक रौप्यपदक पटकावले. ही प्रतिष्ठित स्पर्धा राष्ट्रीय नाच घर, काठमांडू येथे पार पडली असून विविध देशांतील शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी डायडाज डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांची भारतीय संघामध्ये निवड झाली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कला, मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर चिपळूणचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले.
स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे- गार्गी राजेश सुपे – अंडर ८ फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक, द्विज हेमंत जाधव- अंडर १२ हिपहॉप स्टाईल प्रकारात सुवर्णपदक, चेतना दुष्यंत खेडेकर व प्रीत प्रतीक मसुरकर- अंडर १४ डुएट फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक, आरती सुयोग गार्डी व कश्मिरा यज्ञेश पवार- सुपर मॉम्स फोक स्टाईल (३५ वर्षांवरील गट) मध्ये सुवर्णपदक, विशाखा योगेश देसाई – फ्री स्टाईल (३५ वर्षांखालील गट) मध्ये रौप्यपदक. या सर्व विद्यार्थ्यांनी डायडाज डान्स स्टुडिओमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाच्या बळावर आंतरराष्ट्रीय मंचावर आपली कला सादर करत सुवर्ण अक्षरांनी यशाची नोंद केली आहे. या यशामागे डायडाज डान्स स्टुडिओचे संचालक तसेच राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चेअरमन सूरज विलास जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण यश संपादन केले आहे. याशिवाय, या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांची आगामी “एशियन डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप- मलेशिया”साठी निवड झाली असून त्यांना विशेष स्कॉलरशिपही प्राप्त झाली आहे.
हे विद्यार्थी पुन्हा एकदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पदक वितरण साऊथ एशियन फेडरेशन ऑफ डान्स स्पोर्ट्स व नेपाळ डान्स स्पोर्ट्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अर्पण सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण डान्स प्लस सीझन ६ विजेते तेजस धुवनखेडे यांनी केले. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त झाले. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि पाकिस्तान या देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत चॅम्पियनशिप ट्रॉफीवरही आपले नाव कोरले. डायडाज डान्स स्टुडिओच्या या ऐतिहासिक यशामुळे चिपळूण शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.