loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.१२ टक्के

सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून सावंतवाडी तालुक्यातील महाविद्यालयांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुक्यातील अनेक नामांकित शिक्षण संस्थांनी १०० टक्के निकाल लावत यशाची परंपरा कायम राखली आहे. तालुक्याचा निकाल ९३.१२ टक्के एवढा लागला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जाहीर झालेल्या निकालात श्री पंचम खेमराज महाविद्यालय ८९.६० टक्के, राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज ९५.४६ टक्के, खेमराज मेमोरियल, बांदा ९५.९५ टक्के, जनता विद्यालय, तळवडे ७५ टक्के, कळसुलकर हायस्कूल ६८.५७ टक्के, विद्याविहार इंग्लिश स्कूल, ओटवणे ९२.३० टक्के, माध्यमिक विद्यालय, सांगेली ८९.१० टक्के, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ९७.५० टक्के, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ९६.७७ टक्के, शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा (ज्युनिअर कॉलेज) ९० टक्के, मिलाग्रीस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज १०० टक्के, चौकुळ इंग्लिश स्कूल १०० टक्के, गव्हर्नमेंट आय.टी.आय., सावंतवाडी ८४.६१ टक्के, खेमराज मेमोरियल, बांदा (MCVC) ९३.९३ टक्के एवढा लागला असून बांदा हायस्कूल, मिलाग्रीस हायस्कूल आणि चौकुळ इंग्लिश स्कूल या तीन विद्यालयांनी १०० टक्के निकाल लावून अव्वल स्थान पटकावले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg