सावंतवाडी (प्रतिनिधी) - शास्त्रीय संगीतातील नवोदित आणि हौशी गायक-गायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ आणि सम्राट क्लब मये गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने '२० व्या सम्राट संगीत सितारा' या भव्य शास्त्रीय संगीत स्पर्धेचे सावंतवाडी शहरात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची पहिली प्राथमिक फेरी रविवार १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वा. सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपालिका सभागृहात पार पडणार आहे. तर अंतिम फेरी जागतिक संगीत दिनी २१ जूनला कला अकादमी गोवा येथे होणार असून इच्छुक स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ चे राज्य अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शास्त्रीय संगीताचा वारसा जोपासणाऱ्या या स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक २५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक २० हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक १५ हजार रुपये व चषक याव्यतिरिक्त तीन स्पर्धकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी नोंदणी विनामूल्य आहे. अर्जाची अंतिम मुदत १ मे रोजी संपणार होती. मात्र, इच्छुक कलाकारांचा प्रतिसाद लक्षात घेता आयोजकांनी ही मुदत आता ७ मे २०२६ पर्यंत वाढवली आहे. नोंदणी ऑनलाईन (गुगल फॉर्म) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. प्रत्येक केंद्रावर केवळ पहिल्या २० पात्र अर्जांनाच प्रवेश दिला जाणार असल्याने कलाकारांनी त्वरित नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथे १५ ते २५ वयोगटातील हौशी कलाकारांसाठी ही स्पर्धा असून व्यावसायिक गायकांना यात सहभागी होता येणार नाही. प्राथमिक फेरीत निवडलेल्या चार रागांपैकी एका रागाचे १५ मिनिटांचे सादरीकरण करावे लागेल. स्पर्धेची भाषा हिंदी किंवा ब्रिज असेल. उपांत्य फेरीसाठी एकूण १२ स्पर्धकांची निवड केली जाईल, ज्यातून ६ जण अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. मागील वर्षीच्या विजेत्याला यंदा सहभागी होता येणार नाही. स्पर्धकांसाठी तबला आणि हार्मोनियमची साथसंगत आयोजकांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही प्राथमिक फेरी सर्व संगीतप्रेमींसाठी खुली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पुनाजी यांना केले आहे. दरम्यान, प्राथमिक फेरीत निवडलेल्या चार रागां पैकी एका रागाचे १५ मिनिटांचे सादरीकरण करावे लागेल. उपांत्य व अंतिम फेरीत खयाल (१५ मिनिटे) व मध्य लय बंदिश (५ मिनिटे) सादर करावी लागेल. एकूण १२ सहभागी उपांत्य फेरीसाठी निवडले जातील, त्यापैकी ६ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार आहे.
१० मे रोजी प्राथमिक फेरी सावंतवाडी येथे, २४ मे ला मडगाव येथे, ३० मे ला डिचोली येथे, ७ जून ला बेळगाव येथे पुढील फेऱ्या होणार आहेत. उपांत्य फेरी १४ जून ला गोवा ब्लॅक बॉक्स येथे होणार असून २१ जूनला जागतिक संगीत दिनी अंतिम फेरी होऊन विजेते घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सम्राट संगीत सिताराचे चेअरमन महेश गांवकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी नरेश (९५११७५८८३६), सम्राट मंगेश (९८३४७५५१७८) आणि सम्राट सज्जन (७८७५२४१०४१) यांना संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. यावेळी सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ अध्यक्ष शशिकांत पुनाजी, सम्राट क्लब मये अध्यक्ष नरेश पेडणेकर, सम्राट संगीत सितारा चेअरमन मंगेश गांवकर, खजिनदार सपना परब- मातोंडकर, साखळीचे अध्यक्ष उद्योजक चेतन सालेलकर आदी उपस्थित होते.







































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.