loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाट येथे अपघातांची मालिका

खेड (दिलीप देवळेकर) - मुंबईवरून रत्नागिरी दिशेने जात असलेल्या एर्टिगा कार आज सकाळी ९.४५ वाजता क्रमांक एमएच-०३-बीजे-२२९० चालकाचे नियंत्रण चुकून सुरक्षा भिंतीवर आदळून अपघात झाला. अपघातात निकिता अनंत साळवी (वय ३०) मुंबई मालाड, अश्विनी अनंत साळवी (वय ५८) मुंबई मालाड, अनंत शंकर साळवी (वय ६१) मुंबई मालाड, अद्विक कृष्णा नवाले (वय ५वर्ष) मालाड आदी जखमी झाले. तसेच दुचाकी क्र.एमएच-०४-एमके-१७६४ चालकाचे गतिरोधक येथे नियंत्रण सुटून मोटरसायकलस्वार दोन जण जखमी झाले. अपघातात साहिल संतोष बुदर (वय २२) चिपळूण, अक्षय गंगाराम बुदर (वय २५) रा. चिपळूण हे दोघे जखमी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरील दोन्ही अपघातांची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीका तात्काळ घटनास्थळी पोहचली आणि खेड ट्राफिक पोलीस संपत गीते यांच्या मदतीने जखमींना घेऊन उपजिल्हा रुग्णालयात कळंबणी येथे दाखल करण्यात आले. रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी तातडीने मदतकार्य केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg