loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंबोली येथे दि.२३ व २४ मे रोजी पतसंस्थांचे अधिवेशन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दि.२३ मे व २४ मे २०२६ रोजी आंबोली येथे होणाऱ्या पतसंस्थांच्या अधिवेशनाची जय्यत तयारी करण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांचा एकोपा अधिक वाढावा, कामकाजात एकसुत्रीपणा यावा, सर्वच पतसंस्थांनी एकमेकांना सहाय्यभूत राहून काम करावे, व भविष्यात स्पर्धात्मक आव्हानांना अधिक प्रखरपणे तोंड देता यावे या व अशा अनेक उद्देशाने हे अधिवेशन आयोजित केलेले असून त्याची पूर्वतयारी म्हणून सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील पतसंस्थांची बैठक नुकतीच घेण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पतसंस्थांचे हे पहिलेच अधिवेशन होत असून या अधिवेशनामध्ये सर्व पतसंस्था उस्फुर्तपणे सहभाग दर्शवत आहेत. पतसंस्थांचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अनेक पतसंस्थांनी आर्थिक स्वरुपातसुद्धा विविध पातळीवर हातभार लावण्याचे काम सुरु केलेले आहे. त्याबद्दल सुद्धा अध्यक्ष राऊळ यांनी आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्याभरातून पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेने सहभागी होत असून नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अनेक पतसंस्थांनी विविध ठिकाणी रोडवर स्वागताच्या कमानी उभ्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच पतसंस्थांचे पदाधिकारी हे सुद्धा आपल्या शुभेच्छाचे बॅनर अनेक ठिकाणी लावणार असल्याचे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यातून पतसंस्था चळवळीमध्ये काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे काम करणाऱ्या अनेक पतसंस्थांना गौरविण्यात येणार असून त्यांना गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, व शाल व श्रीफळ देऊन त्याठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहेत. तसेच सहभागी प्रतिनिधीना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर अधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व आमदार दिपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकणभवन, सोपान शिंदे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग या सर्व मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

तसेच महाराष्ट्र राज्यातून राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, कोकण विभाग पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी आदी मान्यवरांना निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. अशी माहिती अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली. यावेळी फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सावंतवाडी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश बोंद्रे, वैश्यसमाज पतसंस्थेचे संचालक अड. समिर वंजारी, पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक महेश्वर कुंभार तसेच वि‌द्यासेवक पतसंस्थेचे अध्यक्ष काकतकर व कृषी कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल टेमकर, कॅथॉलिक पतसंस्थेचे एवरेस्ट मेडीस, जेम्स फर्नाडीस, व्यापारी पतसंस्थेचे गंगाराम सावंत, सावंतवाडी पतपेढीचे नारायण तेंडोलकर, स्नेहनागरी पतसंस्थेच्या संगीता प्रभू, भवानी पतसंस्थेचे भिकाजी गवस, पंचद्रविड ब्राह्मण पतसंस्थेच्या तृप्ती बखले, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे विनय आंदुर्लेकर, उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg