loader
Breaking News
Breaking News
Foto

असनिये येथे पिता-पुत्रांवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला, तक्रार दाखल

बांदा (प्रतिनिधी) - गोवा येथून असनीये येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पिता–पुत्रांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विठ्ठल मधुकर ठीक्कर आणि मधुकर विठ्ठल ठीक्कर (दोघेही रा. गोवा) हे असनीये येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते ३० एप्रिल रोजी रात्री सुमारे पावणेदहाच्या सुमारास आपल्या गावी परत जात असताना असनीये परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हल्लेखोरांनी गाडी थांबवून दोघांना बाहेर उतरायला भाग पाडले. त्यानंतर एका व्यक्तीने दांड्याने मारहाण केली, तर इतरांनी गाडीवर दगडफेक केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. घटनेचा अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg