loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात प्रवासी संख्येवरून होडी व्यवसायिक व बंदर विभाग यांच्यात वाद

मालवण (प्रफुल्ल देसाई / भूषण मेतर) - मध्यप्रदेश येथील जबलपूरमध्ये घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण बंदर जेटी येथून होणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीमध्ये होडीतून केवळ वीस पर्यटक प्रवासी न्यावेत असे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने होडी व्यावसायिक व बंदर अधिकारी यांच्यात वादावादी होऊन होडी व्यवसायिकानी होडी सेवा काही काळ बंद ठेवली. सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असून तसेच पेट्रोल मिळत नसल्याने एका होडीतून २० पर्यटक नेणे परवडणारे नाही अशी व्यथा यावेळी होडी व्यवसायिकानी मांडली. तसेच आम्ही पर्यटकांना लाईफ जॅकेट घालण्याच्या सक्तीबरोबरच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच होडी वाहतूक करत आहोत असेही व्यवसायिकानी स्पष्ट केले. या वादानंतर बंदर विभाग अधिकारी व होडी व्यावसायिक यांच्यात झालेल्या चर्चेतून एक होडीत ३० प्रवासी नेण्यात यावेत असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर किल्ला होडी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg