loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखली साळवीवाडी स्वामी समर्थ मठाच्या ४१ वा वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठामध्ये मंगळवार दिनांक १२ मे ते शुक्रवार दिनांक १५ मे २६ पर्यंत चार दिवस स्वामी समर्थ मठाचा ४१ वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार १२ मे रोजी सकाळी ९ वा. गणेशयाग, महाआरती, भंडारा. सायंकाळी ७.३० नामस्मरण, महाआरती, इतर धार्मिक कार्यक्रम. बुधवार १३ मे २०२६ सकाळी ९ वा लक्ष्मीयाग, महाआरती, भंडारा. संध्याकाळी ७.१५ वा.नामस्मरण, महाआरती, इतर धार्मिक कार्यक्रम. गुरुवार १४ मे रोजी सकाळी ९ वा. दत्तयाग, महाआरती, भंडारा, सायंकाळी ७.३० वा. नामस्मरण, महाआरती, इतर धार्मिक कार्यक्रम. शुक्रवार दि. १५ मे रोजी सकाळी ७ वा. स्वामी समर्थांचा अभिषेक, पूजा, सकाळी ९ वा. स्वामी समर्थ नामावली, होमहवन, महाआरती, भंडारा सायंकाळी ५ वाजता स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक, ९.३० वाजता महाआरती, नामस्मरण, भंडारा. रोज रात्री हरिपाठ, भजन, कीर्तन, भक्तीगीतांचे कार्यक्रम होणार आहेत. स्वामी समर्थ भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. भव्य दिव्य असा ४१ वा वर्धापन दिन स्वामी समर्थ मठाचा आयोजित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg