रसायनी (राकेश खराडे) - साईकृपा हॉटेलसमोर कर्नाळा खिंड मुंबई गोवा महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर बस पलटी झाल्याने दुपारी मोठा अपघात घडला. या अपघातात रुद्र म्हात्रे वय 8 वर्षे, रवींद्र माने वय 37 वर्षे, प्रियांका माने वय 30 वर्षे, विना माने वय 56 वर्षे, नागेश कुणाल वय 60 वर्षे, रूपा कोलारे वय 44 वर्षे, जीत माने वय 34 वर्षे, सदाशिव सोमने वय 42 वर्षे, सीता माने 55 वर्षे आणि स्नेहा माने यांच्या हातापायाला व कमरेला व डोक्याला जबर मार लागून सर्व बस मधील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पळस्पे- कर्नाळा खिंड येथून 24 तास सेवा देणारी मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या या सेवेमार्फत जखमीस तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. रुग्णवाहिकेद्वारे नानासाहेब धर्माधिकारी हॉस्पिटल, पनवेल येथे दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे जखमीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत झाली आहे.
सदर रुग्णवाहिकेचे चालक विश्वास पाटील यांनी तत्परतेने सेवा बजावत जखमीस सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचविले. या तातडीच्या आणि निःस्वार्थ सेवेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवेतून आतापर्यंत 32,840 अपघातग्रस्तांना वेळीच मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत.. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रायगड मधील अँम्ब्युलन्स कर्नाळा खिंड, विठ्ल कामत हॉटेल जवळ महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी विनामूल्य तैनात करण्यात आली आहे, तरी आपण सर्वांनी महामार्गावरील अपघात ग्रस्तांच्या विनामूल्य सेवेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.. ८८८८२६३०३०/८३२९४२५९०८ असे आवाहन करण्यात आले आहे.














































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.