रसायनी (राकेश खराडे) - 'जगाला युद्ध नको, बुद्ध हवा' हा शांततेचा संदेश घेऊन सम्यक सामाजिक संस्था, रसायनी यांच्यावतीने विश्ववंदनीय तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि थोर महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा १ मे रोजी रिस आणि रसायनी परिसरात संपन्न झाला असून, यानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रंगली होती. सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट महापुरुषांचे विचार जनमानसात रुजवणे हा आहे.
या जयंती महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि रमाई आंबेडकर यांसारख्या युगपुरुषांच्या आणि क्रांतीज्योतींच्या विचारांना वंदन करून दिवसभराचे नियोजित कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी धम्मवंदनेने झाली असून महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी व प्रेरणा देण्यासाठी भिम-बुद्ध स्वरांजली' हा सुश्राव्य संगीताचा कार्यक्रम रात्री जल्लोषात पार पडला. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सम्यक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आठवडाभर मेहनत घेतली. "हा उत्सव केवळ एक सोहळा नसून सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देणारे व्यासपीठ आहे," असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या संयुक्त जयंती महोत्सवासाठी रसायनी आणि परिसरातील नागरिक, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.














































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.