loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरमध्ये समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांचा स्थानिक तरुणांनी वाचवला जीव

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर समुद्र किनार्‍यावर स्नानाचा आनंद घेताना खोल रामुद्रात गेल्याने सातार्‍यातील दोन तरुण बुडत होते. स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे या दोघांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. सध्या शालेय सुट्ट्या सुरू असल्याने गुहागर येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र नगरपंचायतीने नियुक्त केलेले जीव रक्षक सध्या उपलब्ध नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज सकाळी सुमारे ८.३० ते ८.४५ वाजण्याच्या दरम्यान, खालचापाठ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील हॉटेल किस्मतच्या मागील बाजूस असलेल्या समुद्र किनार्‍यावर सातार्‍यातील सिद्धांत पाटील आणि शुभांकर हे दोघे समुद्र स्नान करत होते. स्नानाचा आनंद घेत असताना त्यांना खोल समुद्रात जाण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे ते अधिक खोल पाण्यात गेले आणि गटांगळ्या खाऊ लागले. किनार्‍यावर उपस्थित असलेल्या स्थानिक तरुणांनी ही घटना लक्षात येताच तत्काळ धाव घेतली आणि दोघांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले. त्यांच्या या धाडसी प्रयत्नामुळे मोठी दुर्घटना टळली. या बचावकार्यामध्ये मुजहीद मिरकर, सफायत बागकर, अक्षय लोखंडे, फैसल, उमेश भोसले, ओम भोसले आणि अनिल आदी स्थानिक तरुणांनी सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg