loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे जिल्हा परिषद सदस्य स्वीकारणार पालकत्व

रत्नागिरी: राज्यात कुपोषित बालकांच्या आकड्यात रत्नागिरी जिल्हा शेवटून दुसरा आहे. जिल्ह्यात ६३२ कुपोषित बालके असली तरीही ३८ जास्त कुपोषित आहेत. पुढील दोन महिन्यांत या सर्वांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न आहे. हॉस्पीटलसारखी यंत्रणा उभी करून, तिथे पालकांना मुलासह आणून ८ दिवस औषधोपचार आणि पोषण आहार देऊ. तसेच ५६ जि. प. सदस्यांकडे पालकत्व दिले आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत आरोग्य व शिक्षण विभागाचा आढावा त्यांनी आज घेतला. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, सभापती, जि. प. सदस्य उपस्थित होते. ते म्हणाले की, डेरवण येथील रुग्णालयाच्या मदतीने या बालकांना प्रथिनयुक्त आहार आणि पौष्टिक लाडू दिले जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून औषधे आणि पोषण आहारासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कुपोषित बालकांची संख्या पुढील वर्षात ५० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे.

दरवर्षी १० प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करणार आहोत. याकरिता १० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. जिल्हा शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय आदी इमारती अद्ययावत करून जास्तीत जास्त आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला आहे. शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मराठी शाळांमध्येही संख्या वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या २५० खोल्या नव्याने बांधण्यात येणार आहेत. याकरिता पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये दिले जातील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg