loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाची नव्याने पुनर्रचना करण्याचा निर्णय

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचा अधिकृत पत्रकार संघ असलेल्या ‘रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघा’ची आता पुनर्रचना करण्यात येणार असून या पत्रकार संघाच्या सर्व आजीव सभासदांनी संपर्क साधून आपल्या सभासदत्वाचे नुतनीकरण करुन घ्यावे तसेच नवीन इच्छुक पत्रकारांनी आजीव सभासद व्हावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. पूर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे एकत्र असल्याने या ‘रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघा’चे कार्यक्षेत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे होते. मध्यंतरीच्या काळात या पत्रकार संघाच्या काही पदाधिकारी व सभासदांचे कोरोनामुळे दु:खद निधन झाले. तसेच पत्रकार संघाचे रत्नागिरीत जयस्तंभ येथे मध्यवर्ती ठिकाणी अनेक वर्षांपासूनचे जुने कार्यालय होते, तेथे पत्रकार परिषदा होत असत. परंतु ते अकस्मात काढून घेण्यात आले. तेथे पत्रकार संघाची कागदपत्रे होती, ही कागदपत्रे कपाटासकट नाहीशी करण्यात आली. त्यामुळे काही काळ जिल्हा पत्रकार संघाचे कार्य विस्कळीत झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा पत्रकार संघाचे कै. रशिद साखरकर हे अध्यक्ष असताना पत्रकार संघाचा नावलौकीक होता व दबदबा होता. त्यांच्या निधनानंतर आजीव सभासदांनी एकत्र येऊन जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पिलणकर यांची प्रभारी अध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली आता रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजीव सभासदांची पुर्ननोंदणी करुन आजीव सभासद यादी परिपूर्ण करण्यात येईल व त्यानंतर नवीन जिल्हा कार्यकारणी व प्रत्येक तालुक्यात तालुका कार्यकारणी स्थापन करण्यात येईल.

टाइम्स स्पेशल

त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व आजीव सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे नुतनीकरण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. नुतनीकरणासाठी आवश्यक तो अर्ज व माहिती मोबाईल क्र. 7710020666 वर उपलब्ध आहेत. पूर्वीच्या आजीव सभासदांनी तसेच नव्याने सभासद होऊ इच्छिणार्‍या पत्रकारांनी कृपया या व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क साधून नुतनीकरणाचा अर्ज प्राप्त करावा व तो दि. 31 जुलै 2026 पर्यंत सादर करावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg