loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजसेवक डॉ. ज्ञानेश्वर साळोखे यांना 'महाराष्ट्र रत्न पुरस्कार–२०२६' प्रदान

कर्जत (जयेश जाधव) - अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन, नवी दिल्लीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर साळोखे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत 'महाराष्ट्ररत्न पुरस्कार–२०२६' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी डॉ. अविनाश सकुंडे (इंटरनॅशनल ह्युमन रायट्स प्रेसिडेंट), ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, बापूसाहेब भोसले (दलित पँथर अध्यक्ष), डॉ. महेश थोरवे (डायरेक्टर, युनिव्हर्सिटी, कोथरूड), डॉ. आदित्य मोहता यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. साळोखे गेली १७ वर्षे सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शालेय विद्यार्थी, मतिमंद व अनाथ मुलांसाठी विविध उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, महिला सक्षमीकरण, पत्रकार, शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव, नशामुक्ती आणि अमली पदार्थविरोधी जनजागृती, तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना ८ राष्ट्रीय पुरस्कारांसह राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यावर्षीचा 'महाराष्ट्र रत्न पुरस्कार–२०२६' मिळाल्याने त्यांच्या कार्याचा आणखी एक सन्मान झाला आहे. या पुरस्कारानंतर मित्रपरिवार, नातेवाईक व विविध सामाजिक संस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, हा पुरस्कार समाजसेवेची प्रेरणा अधिक बळकट करणारा असल्याची भावना डॉ. साळोखे यांनी व्यक्त केली. तसेच पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या आयोजक संस्था व उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg