पुणे - पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे (वय 65) या नराधमाला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (सोमवारी, 29 जून) मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. विशेष म्हणजे, गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत आणि खटल्याची सुनावणी केवळ 16 दिवसांत पूर्ण करून निकाल देण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच आणि सर्वात जलदगतीने निकाली लागलेला खटला ठरला आहे. चार दिवसांपूर्वी (25 जून) न्यायालयाने कांबळेला दोषी ठरवले होते, मात्र शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. आज अंतिम निकाल देताना न्यायाधीशांनी नोंदवलेली निरीक्षणे अत्यंत हादरवून टाकणारी होती.
निकालाचे वाचन करताना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीच्या क्रूरतेवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. "आरोपीने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताही पर्याय ठेवला नाही. तिच्यावर अमानुष अत्याचार केले, एवढेच नाही तर हत्येनंतरही त्याने तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केले. अशा नराधमाला फाशीची शिक्षा देखील अपुरीच आहे." "मुलीच्या अंगावर तब्बल 18 जखमा होत्या. तिचा श्वास कोंडण्यासाठी तिची पँट तिच्या तोंडात 21 सेंटीमीटर आत कोंबण्यात आली होती. असहाय्य मुलीने अतोनात वेदना सहन केल्या." "आरोपीने सुधारण्याची पातळी कधीच ओलांडली आहे. त्याचा पूर्व इतिहास पाहता (यापूर्वी 53 वर्षांचा असताना त्याने कुटुंबातील मुलीवर आणि एका वृद्धेवरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता) त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. ही घटना 'दुर्मिळातील दुर्मिळ' (Rarest of Rare) श्रेणीत मोडते."
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 निकालांचे दाखले दिले. या सर्व निकालांचे नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य होते.न्यायाधीशांनी अंतिम निकाल देताना 'निर्भया प्रकरण', 'बशर अली केस', 'शंकर खाडे केस' आणि 'बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब' या प्रकरणांचे दाखले दिले. "शांत डोक्याने कट रचून केलेली हत्या, गुन्ह्यातील क्रूरता आणि या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का हे सर्व घटक फाशीच्या शिक्षेसाठी पात्र ठरतात. स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी असहाय्य बालिकेसोबत केलेले हे कृत्य अमानवी आहे," असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालादरम्यान न्यायालयाने पोलीस आणि तपास यंत्रणांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले."गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १६ दिवसांत पोलिसांनी भक्कम आरोपपत्र दाखल केले. उन्हाळ्याच्या सुट्टीतही कोर्टाने या खटल्याला पूर्ण वेळ दिला. 55 साक्षीदार तपासले गेले.
































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.