loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत गुटखा विक्रेत्यावर कारवाई; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त, एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री करणार्‍यावर कारवाई करत २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली पोलीस स्टेशन गल्ली येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री करणारे कृष्णा नारायण गवळी (वय ६०, रा. पांढरेवाडी स्टॉप, स्वामी व्हिला, दापोली) यांच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली पोलिसांनी काल (ता.२८) रोजी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास केलेल्या कारवाईत गवळी यांचेकडून २१ हजार ७८० रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पान मसाल्याच्या पुड्या २ हजार ४२० रुपये किमतीच्या सुगंधित तंबाखूच्या पुड्या असा एकूण २४ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवणे व त्यांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे.

टाईम्स स्पेशल

गवळी यांनी जाणीवपूर्वक प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी ठेवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कृष्णा गवळी यांचे विरोधात भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक निर्मळ करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg