loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवणे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणे नं.१ व जिल्हा परिषदआदर्श शाळा शिवणे नं.२ येथील विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांच्या हस्ते मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच उत्साहात संपन्न झाले. श्री समर्थ जीवन प्रतिष्ठान, सांताक्रुज (मुंबई) या सामाजिक संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवणे गावच्या सरपंच मनस्वी महेंद्र ठोंबरे या होत्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जनार्दन सुर्वे यांनी प्रास्ताविकामध्ये श्री समर्थ जीवन प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याचा आढावा घेताना समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी प्रतिष्ठानचे सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात, तसेच शिक्षण एक समाज परिवर्तनाची खरी ताकद आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असे स्पष्ट मत जनार्दन सुर्वे यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, रंगाचे साहित्य, पाऊच आदी. शैक्षणिक साहित्य खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, संस्कार, नियमित अभ्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे सक्षम नागरिक आहेत. त्यांच्यामध्ये ज्ञान प्राप्ती आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव आणि कर्तव्य निर्माण करणे याची मान्यवरांनी जाणीव करून दिली. व श्री समर्थ जीवन प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेट नेटके सूत्रसंचालन जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नंबर 2 चे मुख्याध्यापक दिनेश काशिनाथ जाक्कर यांनी केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपसरपंच सदानंद रामचंद्र जोशी, तंटामुक्ती समितीचे शंकर जानू जोशी, श्री. समर्थ जीवन प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष शिवाजी चव्हाण, गिरीश चव्हाण, "मुंबईश्री"किताब प्राप्त महेश राणे, जनार्दन सुर्वे, दिगंबर शिंदे, सचिन जाधव, प्रवीण हरमळकर, मंगेश गोडांबे, रामचंद्र राणे, संतोष नवाळे, विजय भातुसे, गणपत आचरेकर, संतोष तेली, नितीन पावस्कर, सतीश सावंत, निलेश सागवेकर, भूषण चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणे नं.१ चे मुख्याध्यापक दीपक हाके, शिक्षक नितीन गायकवाड, गोविंद वळवी, प्रदीप बोंद्रे, अंगणवाडी सेविका वृषाली जोशी यांचे सह दोन्ही शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg