loader
Breaking News
Breaking News
Foto

फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात

पनवेल : पनवेल शहर परिसरात बंद दुकानाची कडी कोयंडे उचकटून आतमध्ये असलेली रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून तो गुजरात येथे पळून जात असताना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसामध्ये पनवेल शहरातील लकी स्पोटर्स्‌‍, सखी कलेक्शन, बिकानेर स्वीटस्‌‍, श्रीकृपा स्टेशनरी, बुक शॉप या ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरी करून दुकानातील फक्त रोख रक्कम चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर चोरट्याला शोधण्याचे पनवेल शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याबाबत वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दत्तात्रेय देवकाते, पो.हवा.संदेश म्हात्रे, मिथुन भोसले, अमोल पाटील, पो.शि.साई मोकळ, काकडे आदींच्या पथकाने सदर गुन्हेगाराचा तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेत असताना सराईत गुन्हेगार जगदीश फराड (45, रा.चिंध्रण) याची माहिती मिळाली.

टाईम्स स्पेशल

त्यानुसार पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने या चोऱ्यांची कबुली दिली असून त्याने यापूर्वी सुद्धा पनवेल शहर परिसरात अशाच प्रकारे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हा फक्त रोख रक्कमच चोरत असे व त्यानंतर तो गुजरात येथे त्याच्या घरी जात असे व काही दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारे चोरी करीत असल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg