loader
Breaking News
Breaking News
Foto

झालमुरी, एस.डी., आर.डी. आणि सुरांची अवीट मैफल; ‘पुरवैय्या’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी

पनवेल :- पश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, सलील चौधरी, सचिनदेव बर्मन, राहुल देव बर्मन, हेमंत कुमार आणि किशोर कुमार यांसारखे दिग्गज संगीतकार व गायक दिले. त्यांच्या अजरामर सुरांनी अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त करत भारतीय संगीतविश्व समृद्ध केले आहे. या सुवर्णकाळातील कालातीत गीतांचा सुरेल प्रवास उलगडणारा ‘‘पुरवैय्या’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख सहयोगाने तसेच वाय नॉट प्रॉडक्शन, फॅबल फॅक्टरी यांच्या वतीने पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांगला संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या मधुर हिंदी गीतांचा अनोखा सुरेल प्रवास या कार्यक्रमातून सादर करण्यात आला. सुरेल गायन, अप्रतिम वाद्यसंगत आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. हिंदी चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या बांगला संगीतकारांच्या अजरामर रचनांचा आनंद पनवेलकरांना या कार्यक्रमातून अनुभवता आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते. प्रत्येक गीताला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सुरेल संगीत, जुन्या आठवणी आणि दर्जेदार सादरीकरण यांचा संगम असलेला ‘पुरवैय्या’ हा कार्यक्रम पनवेलकर रसिकांसाठी एक आगळावेगळा आणि अविस्मरणीय सांगीतिक अनुभव ठरला. हरहुन्नरी कलाकार पुष्कर क्षोत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सांगीतिक मैफलीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन आणि इतर दिग्गज संगीतकारांच्या गाजलेल्या गीतांनी सभागृहात अविस्मरणीय वातावरण निर्माण झाले.

टाईम्स स्पेशल

या सांगीतिक सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, तसेच भाजपचे भाजपा प्रवक्ते आणि उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रौगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, नगरसेवक सुमित झुंझारराव, नगरसेविका प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस रूपेश नागवेकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg