loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गाच्या व्यथा संपता संपेना

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या व्यथा संपता संपत नाहीयेत. शासनाने मुंबई गोवा महामार्गावर निवळी कोकजेवठार येथे टोलनाका बांधला आहे. या टोल नाक्यावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि सर्व लाइन व्यवस्थित बांधून झाल्या आहेत. पण सर्व सेवा बंद आहेत. निवळी टोलनाक्यावर बाथरूम आहे पण बंद, लाईट आहे पण बंद आणि रस्ते आहेत तेही बंद. अशाप्रकारे सर्व सोयी सुविधांनी युक्त टोल नाका आहे पण सर्व सुविधा बंद आहेत. निवळी टोलनाका येथील बाथरूम चा वापर सर्व सामान्य नागरिकांना बंद करण्यात आला आहे, त्यामुळे या द्रुतगती मार्गावर आकस्मिक स्थितीत सामान्य नागरिकांना उघड्यावर बसायची वेळ आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवळीतील हा टोलनाका पूर्णपणे उतारावर असल्याने गाड्या भरधाव वेगाने येत असतात, अशा स्थितीत तेथील लाईट बंद असल्याने रात्रीच्यावेळी चालत जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व लेनची कामे झाली असताना केवळ दोन लेन, आणि त्याही अगदी दोन्ही टोकाला, एक उजवीकडे आणि एक डावीकडे अशी चालू ठेवली आहे. निवळीतून भरधाव येणार्‍या गाड्या या टोकाच्या लेनकडे येताना पलटी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भीषण अपघात होऊ शकतो. शासनाने टोलनाका चालू होईपर्यंत या सुविधा जनतेला द्यायच्या नाहीत असा चंग बांधला असे वाटते.

टाईम्स स्पेशल

सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करायला प्रशासनाला सुचत नाहीये. एक सामान्य नागरिक म्हणून आमची विनंती आहे की, निवळी टोलनाका येथील बाथरूम, लाईट आणि रस्ता हा सामान्य जनतेसाठी चालू करावा आणि सामान्य नागरिकाला होणार्‍या त्रासातून आणि संभाव्य अपघातातून सुटका करावी. सदर रस्त्यावर अनेक वेळा लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती वावरत असतात. किमान त्यांच्या आरोग्याच्या आणि जीवनाचा विचार करून प्रशासनाने योग्य ती पाऊले लवकरात लवकर उचलावीत अशी विनंती या मार्गावरुन ये-जा करणारे पर्यटक, ग्रामस्थांतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg