loader
Breaking News
Breaking News
Foto

इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीच्या अविराजची विजयी घोडदौड सुरूच

रत्नागिरी :- इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना नॉर्थविक पार्क क्रिकेट क्लब या संघाविरु‌द्ध खेळताना अविराजने ३.१६ च्या सरासरीने ६ विकेट्स घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर अविराजने पुन्हा एकदा सामनावीरचा बहुमान पटकावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हंगामातील नॉर्थविक पार्क क्रिकेट क्लब या संघाविरु‌द्ध खेळताना अविराजने आपल्या गुगलीची कमाल दाखवली आहे. पेशवा क्रिकेट क्लब संघाने प्रथम गोलंदाजी करताना नॉर्थविक पार्क क्रिकेट क्लब संघाला अवघ्या १०० धावांमध्ये रोखले. यात अविराजने कमाल केली. ९ ओव्हर्समध्ये ३.१६ च्या सरासरीने त्याने ६ विकेट्स घेतल्या. हा सामना पेशवा क्रिकेट क्लब संघाने एकही विकेट न गमावता १० विकेट्सनी जिंकला.

टाईम्स स्पेशल

अविराजने या सामन्यात चमकदार कामगिरी करताना ६ विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीरचा बहुमान मिळाला. या हंगामातील अविराजने दुसऱ्यांदा सामनावीरचा किताब पटकावला. या आधी अलेक्झांडर पार्क क्रिकेट क्लब आणि 'लंडन टायगर्स' संघाविरु‌द्ध खेळताना अविराजने अष्टपैलू कामगिरी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg