loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पहिली शिक्षण परिषद उत्साहात

सावंतवाडी : इन्सुली केंद्रांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पहिली शिक्षण परिषद शनिवारी केंद्र शाळा इन्सुली क्रमांक ४ येथे उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. नवीन अभ्यासक्रम, शाळापूर्व तयारी, सेतू अभ्यासक्रम, प्रशासकीय कामकाज तसेच शैक्षणिक नियोजन याबाबत शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी केंद्रप्रमुख ठाकूर, केंद्र मुख्याध्यापक रुपेश परब, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका नेहा सावंत, सुषमा गावडे व रूपाली गवस उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केंद्र मुख्याध्यापक रुपेश परब यांनी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण, शाळापूर्व तयारी, सेतू अभ्यासक्रम तसेच केंद्र संसाधन समूहाच्या पुनर्गठनासह जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. इन्सुली क्रमांक २ शाळेच्या शिक्षिका रक्षा देसाई यांनी शिक्षण परिषदेची प्रभावी अंमलबजावणी, विषयनिहाय नियोजन, शालेय वेळापत्रक आणि 'आयडॉल शिक्षक' निवड प्रक्रियेची माहिती दिली. केंद्रप्रमुख ठाकूर यांनी प्रशासकीय कामकाज, विविध शासकीय योजना आणि आगामी उपक्रमांबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी इन्सुली केंद्रातील शिक्षक अमोल पाटील यांची बांदा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रिया करमळकर आणि सुधीर गावडे यांनी केले. परिषदेला केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक वर्षातील पहिल्याच परिषदेमुळे शिक्षकांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg