loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभारखणी खुर्द येथे 'मागेल त्याला काजू रोपे' योजनेचा शुभारंभ

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - ​संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी खुर्द या गावाचा काजू क्रांतीच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी आणि गावाला पुन्हा हिरवेगार करण्यासाठी युवा नेतृत्व सुमित प्रभाकर मिरगल यांच्या वतीने आयोजित "मागेल त्याला काजू रोपे योजना व शेती विकास शिबिर" अत्यंत उत्साहात पार पडले. या उपक्रमांतर्गत गावातील शेकडो नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत दर्जेदार काजू रोपांचे वाटप करण्यात आले. ​कुंभारखणी खुर्द येथील ग्रामदैवत श्री वाघजाई मंदिर परिसरात देवीच्या आणि श्री गणेशाच्या पूजनाने या मोहिमेचा आणि शिबीराचा प्रारंभ झाला. यावेळी गावातील प्रत्येक वाडीमध्ये (गावणवाडी, बौद्धवाडी, भेलेवाडी, चाफेवाडी, खडकेवाडी, हळदवाडी, गडगेवाडी, भोजनेवाडी आणि मानेवाडी) स्वतः जाऊन गाड्यांमधून आणलेल्या काजू रोपांचे शेतकऱ्यांना थेट हातात वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नैसर्गिक कारणांमुळे किंवा वणव्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, अशा गरजू शेतकऱ्यांना ५ ते २५ गुंठ्यांपर्यंतच्या लागवडीसाठी (साधारण ५० रोपे) पूर्णपणे मोफत वाटप करण्यात आले. या अभियानाला गावातील अबालवृद्धांसह महिला भगिनींनी आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एक सेवा भाव जपत ओसाड जमनीवर आपल्यासह इतरांनी उत्पन्न दणार्या झाडांची लागवड करून माळ हिरवागार करण्याचा मानस असून ​या उपक्रमाबाबत बोलताना मुख्य आयोजक सुमित मिरगल म्हणाले, "आपला गाव समृद्ध आणि सुजलाम् सुफलाम् करणे हेच आपले ध्येय आहे. केवळ रोपे वाटप करून आम्ही थांबणार नाही, तर या झाडांचे योग्य संगोपन, खत व्यवस्थापन आणि छाटणी कशी करावी याबद्दल कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतकऱ्यांना कायम सहकार्य केले जाईल.

टाईम्स स्पेशल

तसेच ही काजू रोपे लगवड करून जास्तीत जास्त जी व्यक्ती उत्तम जगवेल त्या व्यक्तीला प्रोत्साहनपर बक्षिस देऊन सत्कार करण्यात येईल असे सांगून,'मागेल त्याला काजू योजना' आणि 'भाऊसाहेब फुंडकर योजना' या शासकीय योजनांची माहिती आणि अर्ज जागेवरच भरून घेण्याची सोयही या शिबिरात करण्यात आली होती." या स्तुत्य सामाजिक कृषीविषयक उपक्रमाबद्दल कुंभारखणी खुर्द ग्रामस्थांनी सुमित मिरगल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले असून त्यांचे कौतुक केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg