loader
Breaking News
Breaking News
Foto

मळेवाड येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी

मळेवाड : मळेवाड गावात वटपौर्णिमा हा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील विवाहित महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. पहाटेपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजा साहित्यांसह वडाच्या झाडाजवळ, मंदिरात गर्दी केली होती. धार्मिक विधीनुसार ब्राह्मणाच्या उपस्थितीत मंत्रघोषात वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पूजा-अर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर महिलांनी एकमेकींना वाण देत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी आपल्या संस्कृती व परंपरेचे जतन करत हा सण श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भारतीय संस्कृतीतील अशा पारंपरिक सणांचे महत्त्व जपण्याचे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg