loader
Breaking News
Breaking News
Foto

सातगाव कुणबी समाज बोरीवली गटाच्या आरोग्य तपासणी शिबिराला उर्त्स्फूत प्रतिसाद

दापोली (प्रतिनिधी) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग रत्नागिरी केंद्र दापोलीच्या वतीने सातगाव कुणबी समाज बोरिवली गटाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपल्या गटातील रहिवाशांसह परिसरातील रहिवाशांसाठी खास मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या आरोग्य तपासणी शिबिराला मोठ्या संख्येने रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिखलगाव येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक निलेश सांबरे, सचिव केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष ऍड. महेंद्र मांडवकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रक्तदाब आणि शुगर तपासणी, जनरल तपासणी, मार्गदर्शन व मोफत औषध, नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोफत आरोग्य शिबिरास शिबिरार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोग्य तपासणी शिबिराचा संपूर्ण कार्यक्रम हा सातगाव कुणबी समाज बोरीवली गटाचे अध्यक्ष संजय गोरीवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. अशा या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मळे गावचे सुपुत्र आणि यशस्वी व्यावसायिक कमलाकर फिलसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत आणि सुत्र संचालन दिनेश आडविलकर यांनी केले. जिजाऊ संस्थेचे समन्वयक साहील गोरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. तर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई दापोली ग्रामीण शाखेचे अध्यक्ष गजानन पडीयार, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत बैकर, रेणू दांडेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. बोरीवली, चिखलगाव, आघारी, पंचनदी, दुमदेव, मळे आणि देवके अशा गाव वाडयांचा सातगाव कुणबी समाज नावाचा बोरीवली गट आहे, असा गट सक्रिय असून सातत्याने विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, कृषी आदी विषयक विविध प्रकारचे वर्षभरात कार्यक्रम राबवतो. अशाच प्रकारे यावेळी सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.

या आरोग्यविषयक महत्त्वाच्या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघ दापोलीचे अध्यक्ष रमेश पांगत, सचिव रवींद्र घडवले, उपाध्यक्ष मधुकर मोहिते, ओबीसी संघटनेचे दापोली तालुका अध्यक्ष काशिनाथ पोसकर, नंदकुमार शिगवण, अशोक जाधव तसेच किन्हळ गावचे अध्यक्ष किसन जाधव, चिखलगावचे अध्यक्ष राजेश शिगवण यावेळी उपस्थित होते. आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबीर सातगाव कुणबी समाज बोरीवली गटाचे सचिव महेंद्र रेवाळे, उपाध्यक्ष अनिल रेवाळे, शांताराम उसरे, अजित खळे, सदस्य रविंद्र शिंदे, योगेश रहाटे, संतोष भुवड, सल्लागार एकनाथ आदवडे, उत्तम भुवड आदींनी परिश्रम घेतले. या मोफत आरोग्य शिबिरासाठी सातगाव कुणबी समाज बोरीवली गटाच्या मुंबई कार्यकारिणीनेही आर्थिक मदतीचा हात देत कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले. डॉ. सुनिल गोरीवले यांनी सर्व उपस्थित आणि ज्ञात अज्ञातांच्या सहकार्याचे आभार मानत या कार्यक्रमाची सांगता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg