loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून उत्साहात रंगला "महिलांचा विविध कला गुणदर्शन सोहळा २०२६"

खेड : खेड नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सन्मान नारीशक्तीचा "महिलांचा विविध कला गुणदर्शन सोहळा २०२६" मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खेड शहरातील महिला कलाकारांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या सौभाग्यवती ज्योती रामदास कदम, अनिता अरुण कदम तसेच नगराध्यक्ष माधवी बुटाला यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे महिलांना नवे व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिला बालकल्याण समितीच्या सभापती रसिका खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ह्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरसेविका आरती पवार, रेश्मा खतीब, वैभवी खेडेकर, नीता आंब्रे, स्वप्नाली चव्हाण, दिप्ती शिगवण, पंचायत समिती सदस्य कासार, नगरसेवक प्रेमळ चिखले, शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, शिवसेना खेड शहर महिला संघटिका नेहा दळी, युवा सेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन, युवा सेना शहर संघटक मयुरेश दरेकर, संपदा गुजराथी, अश्विनी वडके, नूतन सावंत, श्रेया जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

महिलांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, कला व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळाले असून खेड शहरातील महिला कलाकारांसाठी हा सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमास खेड शहरातील नागरिक, महिला कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महिला बालकल्याण समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg