केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)ः एस/विभागातील २२९ मोटर लोडर कामगार मागील ५ दिवसांपासुन आपल्या नियोजित कामाची प्रतिक्षा करीत आहेत. त्यांना नव्याने देण्यात येणारे साफसफाईचे काम लेखी आदेशाशिवाय त्यांनी स्विकारु नये, असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केले आहे. कचरा संकलन व परिवहन हे काम कंत्राटदारामार्फत करण्याची सुरुवात पालिकेच्या एस/ विभागापासून करण्यात आली आहे. असे झाले तर मोटर लोडर कामगारांच्या नोकर्या, वारसाहक्क व पदोन्नत्या बाधीत होणार आहेत.
याअगोदर दि.२८ जुलै २०२५ रोजी काही कामगार संघटना व पालिका प्रशासन यांच्यामध्ये एक करार झाला होता. या करारात ‘घनकचरा संकलन, परिवहन आणि निष्कासन’ या प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या दि.१४/०५/२०२५ च्या निविदेस कामगार संघटना विरोध करणार नाहीत, असे मान्य करण्यात आले होते. मात्र कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाल्यावर मोटर लोडर कामगारांनी सदर करार धुडकावून लावला आहे. या करारानुसार पालिकेचे ८ हजार मोटर लोडर (कायम कामगार) व सुमारे ७ हजार कंत्राटी कामगार अतिरिक्त ठरणार आहेत. या कामगारांना त्यांच्या कामाशी सुसंगत असे कोणते काम देणार? हे करारात नमूद केलेले नाही.
मात्र प्रशासनाने देऊ केलेले साफसफाईचे काम कोणाच्या आदेशाने देण्यात येत आहे? याबाबत एस/विभागाच्या सहाय्यक आयुक्त समरिन सय्यद सांगू शकल्या नाहीत, असे डॉ. बापेरकर यांनी म्हटले आहे. उपायुक्त, परिमंडळ-६, .संतोषकुमार धोंडे यांच्या आदेशान्वये, एस/ विभागाच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीस सहाय्यक आयुक्त, समरीन सय्यद, सहाय्यक अभियंता सचिन गायकवाड, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, राठोड, सेना युनियनचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर, सदस्य प्रशांत जाधव, शशिकांत पेंढारकर, सचिन बेटकर, विरेंद्र पवार, नितेश सकपाळ, सुनिल शिरसाट, हरिश्चंद्र जाधव व सर्व मोटर लोडर कामगार उपस्थित होते.
































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.