गुणदे (वार्ताहर) - रविवारी दुपारनंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण वाशिष्ठी नदीला पाणी सुरू झाल्याने एमआयडीसी विभागाकडून लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्या व परिसरातील गावांना पाणीपुरवठा सुरू केला. गेले पंधरा दिवस एमआयडीसीच्या वालोपे येथील उदंचन केंद्राजवळ पाणीसाठाच नसल्याने लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसरातील गावांना पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे अनेक कारखाने बंद करावे लागले तर लोटे औद्योगिक वसाहती जवळच्या गावांचा पाणीपुरवठा बंद होता. कारखाने बंद पडल्याने अनेक परप्रांतीय कामगार परतीच्या मार्गावर गेले. तर पाण्याअभावी कारखाने बंद पडल्याने अनेक उद्योजकांचे नुकसानही झाले.
परंतु रविवारी दि २८ रोजी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्टी नदी पुन्हा पाण्याने वाहू लागली. वालपे येथील उदंचन केंद्राजवळ पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे एमआयडीसी विभागाकडून सोमवारी पहाटे पाच वाजता वालोपे येथून पंपिंग करून पाणी लोटे येथील कारखाने व परिसरातील गावांना उपलब्ध करून देण्यात आले. सध्या वाशिष्टी नदीला पाणी वाहू लागल्याने वालोपे येथील उदंचन केंद्रामध्ये पाणी उपलब्ध झाल्याने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असल्याचे एमआयडीसी अधिकारी यांनी माहिती दिली.
































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.