loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत वटपौर्णिमेला पारंपरिक साज, महिलांची पूजेसाठी उत्साही गर्दी

रत्नागिरी (वार्ताहर) - सात जन्मी हाच पती मिळू अशी प्रार्थना वटपौर्णिमेच्या दिवशी करून बहुसंख्य सुवासिनींनी वटवृक्षाची पूजा केली. भारतीय संस्कृतीत वडाचे झाड पूजनीय मानले जाते. रत्नागिरीत वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा करण्यासाठी भर पावसातून देखील महिलांनी सात जन्मोजन्मी हाच पती मला लाभू दे, अशी प्रार्थना मनोभावे भक्ती भावाने वटवृक्षाची पूजा करत विवाहित महिलांनी सुहासिनींनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हळदी-कुंकू, अक्षता, पुष्प, फळांचे वान वाटून सुहासिनी वटपौर्णिमा साजरी केली. त्यानंतर वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून वडाभोवती सात प्रदक्षिणा घालत पतीला निरोगी दीर्घायुष्य लाभो व सात जन्मी हाच पती लाभो, अशी प्रार्थना करत आराधना केली. हिंदू धर्मातील हा सर्वात पवित्र सण मोठ्या उत्साहात रत्नागिरीत सर्वत्र साजरा करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg