loader
Breaking News
Breaking News
Foto

हेदवी प्रा.आ.केंद्रात उपसभापती निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिओ डोस

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी येथे गुहागर तालुका पंचायत समितीचे उपसभापती निलेश विश्वनाथ सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. आपला भारत देश पोलिओ मुक्त आहे परंतु काही देशांमध्ये अजूनही पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो आणि याच कारणांसाठी आपल्या देशातील बालकांच्या संपूर्ण सुरक्षितेची खात्री करून घेण्यासाठी प्रतिवर्षी शासनाच्या वतीने पोलिओ डोस दिले जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याचाच भाग म्हणून २८ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हे,तालुक्यांच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने या पोलिओ डोसचे आयोजन करण्यात येते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य विभागामार्फत या पोलिओ डोसचे योग्य असे नियोजन गुहागर तालुक्यात करण्याचा आले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवीचे सहाय्यक डॉ.कौशल्य वेल्हाळ, परिचारिका शेलार मॅडम, आशा सेविका सौ.रवीना मोहित मॅडम, लाभार्थी बालक, माता पालक उपस्थित होते.या उपक्रमासाठी उपसभापती निलेश विश्वनाथ सुर्वे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg