loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली काळकाई कोड येथे वटपौर्णिमा उत्सव उत्साहात

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - ​दापोली येथील काळकाई कोड परिसरात वटपौर्णिमेचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला. निसर्गाचे प्रतीक असलेल्या वडाच्या वृक्षाची पूजा करून महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून वडाच्या झाडाला सुताचे वेष्टन घातले आणि पूजा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूजेनंतर महिलांनी मनोरंजक उखाणे घेऊन परिसरातील वातावरण प्रसन्न केले. एकमेकींना उखाणे ऐकवताना महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काळकाई कोड परिसरातील स्थानिक महिला मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. ​ही परंपरा जपताना महिलांनी सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचे जतन करण्याचा उत्तम नमुना सादर केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg