loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणचे नगरसेवक मंदार ओरसकर यांची तत्परता; गवंडीवाड्यातील गटाराची समस्या तातडीने मार्गी

मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील गवंडीवाडा प्रभागातील जोएल फर्नांडिस यांच्या घरासमोरील बंदिस्त पाईप गटार तुंबल्याने सांडपाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही बाब नवनिर्वाचित नगरसेवक तथा युवासेना तालुका संघटक मंदार ओरसकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन समस्येची पाहणी केली. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक ओरसकर यांनी तत्काळ आवश्यक उपाययोजना राबवून बंदिस्त पाईप गटाराची दुरुस्ती करून घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच गटारावर सिमेंट प्लेट ब्लॉक्स बसवून पाण्याचा सुरळीत निचरा होईल आणि नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल, याची व्यवस्था करण्यात आली. अल्पावधीत समस्या मार्गी लागल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या तत्परतेचे कौतुक केले. यावेळी बबन वाघ, रोशन कांबळी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg