सावंतवाडी : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात 'पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६' चे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलनकरून सकाळी 8 वाजता पोलिओ डोस पाजून या मोहिमेस प्रारंभ झाला. या उद्घाटन कार्यक्रमास बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देणे अनिवार्य आहे. कोणत्याही बालके पोलिओ डोस पासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. प्रा. केंद्र अंतर्गत एकूण 25 बूथ, 2 मोबाईल टीम 1 ट्रांजिस्ट टीम असे नियोजन असून एकूण 957 लाभार्थ्यांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी उपस्थित पालकांना आपल्या पाल्यांना पोलिओचे डोस देऊन त्यांना सुरक्षित करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्यातर्फे पोलिओ डोस लाभार्थी बालकांना खाऊवाटप देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन सारंग, डॉ. कुबल, प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडेचे आर. आ.र ठाकूर, जिल्हा पर्यवेक्षक, शंकर परब, तालुका पर्यवेक्षक अरुण गवस, तालुका आरोग्य कार्यालय प्रतिनिधी एस. एस. वेटे, आरोग्य सहाय्यक तेजस्वीनी माजगांवकर, समुदाय आरोग्य् अधिकारी मडूरा दिनेश देसाई, कनिष्ठ सहाय्यक, मृणाली कदम, आरोग्य सेविका व अर्चना गोन्साल्विस, एन.सी.डी. स्टाफ नर्स व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
आशा स्वयंसेविका व लाभार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. या मोहिमेत आशा स्वयंसेविका मोलाची भूमिका बजावत आहेत. या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होऊन बांदा परिसरातील नागरिकांनी आपल्या बालकांना लवकरात लवकर पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले. आशा स्वयंसेविका मोलाची भूमिका बजावत आहेत. या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होऊन बांदा परिसरातील नागरिकांनी आपल्या बालकांना लवकरात लवकर पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन केले.
































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.