दोडामार्ग (प्रतिनिधी) - मा. धर्मादाय सह आयुक्त, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार श्री देवी शांतादुर्गा देवस्थान, उसप (नों. क्र. ए-410) च्या विश्वस्त मंडळाच्या दि. 28 जून 2026 रोजी झालेल्या निवडणुकीत श्री देवी शांतादुर्गा पॅनलने 6 पैकी 5 जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला. या विजयी पॅनलचे नेतृत्व प्रकाश सखाराम गवस यांनी केले. नवनिर्वाचित विश्वस्तांनी यापूर्वीही देवस्थानचा कारभार प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे सांभाळला असल्याने मानकरी व भाविकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला. हा विजय वंशपरंपरागत हक्कांचा, मानकऱ्यांच्या एकजुटीचा आणि श्री देवी शांतादुर्गा मातेच्या कृपाशीर्वादाचा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित मानकरी विश्वस्त : सातेरकर मानकरी : प्रदिपसिंह इंद्रसेन देसाई, विरसेन प्रतापराव देसाई ब्राम्हणीकर मानकरी : प्रकाश सखाराम गवस, राजेश वासू गवस केळबेकर मानकरी : भूपेश नारायण गवस घाडीवसकर मानकरी : भरत अर्जुन गवस ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी द. ल. सावंत, तसेच निरीक्षक सत्यनारायण पुंडलिक शेणॉय व बापू शिवराम जाधव (सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, कोल्हापूर विभाग) यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली. विजयानंतर उसप गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित विश्वस्तांनी या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, मानकरी व भाविकांचे आभार मानले. लवकरच कार्यभार स्वीकारून देवस्थानचे सर्व धार्मिक व सामाजिक उपक्रम पूर्ववत सुरू करण्यात येतील, अशी माहिती नव्या विश्वस्त मंडळाने दिली.
































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.