loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने इयत्ता दहावी, बारावी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम उत्साहात

लांजा (संजय साळवी) - सध्या व्यावसायिक शिक्षणाला खुप महत्व प्राप्त झाले आहे. आताचे हे युग तर एआय टेक्नॉलॉजीचे आहे. या एआय टेक्नॉलॉजीमुळे तर भविष्यात छोट्या-मोठ्या नोकऱ्या संपुष्टात येण्याची भिती जाणकार मंडळींकडून व्यक्त केली जात आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पदवी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिकणाकडे वळले पाहिजे. व्यावसायिक शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेसारखा उत्तम पर्याय देखील विद्यार्थ्यांसमोर आहे. त्याचाही विद्यार्थ्यांनी विचार करून आपली स्वतःची तसेच समाजाची प्रगती साधली पाहिजे असे प्रतिपादन तालुक्यातील बोरथडे गावचे सुपुत्र, मुंबईस्थित ज्येष्ठ उद्योजक सुबोध सरफरे यांनी केले. लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने रविवारी २८ रोजी इयत्ता दहावी, बारावी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय लांजा येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुबोध सरफरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावर लांजाच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, नगरसेवक वैभव जोईल, निलिमा कनावजे, पंचायत समिती सदस्या दीपाली साळवी, सदस्य शैलेश खामकर, तालुक्यातील वाडीलिंबू गावचे सुपुत्र व मुंबईस्थित उद्योजक राजेंद्र लोटणकर, तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र व मुंबईस्थित उद्योजक डॉ. विकास पाटोळे, लांजा तालुका मराठा संघाचे कार्याध्यक्ष सुनील कुरूप, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेश खामकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुभाष राणे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी परीक्षेत ७५ टक्के तर बारावी परीक्षेत ६५ टक्के गुण मिळविलेल्या तसेच एनएमएमएस परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांबरोबरच सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांची मनोगते झाली.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला लांजा तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष गणेश लाखण, सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष संजय पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते अनंत उर्फ बापू जाधव, सचिन माजळकर, अभिजित राजेशिर्के, जितेंद्र ब्रीद, धनिता चव्हाण, अनुराधा राणे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लांजा तालुका मराठा संघाचे सरचिटणीस विजय पाटोळे यांनी केले. तर आभार सहचिटणीस प्रजाप माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष सुभाष राणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष सुनील कुरूप, सरचिटणीस विजय पाटोळे, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, उपाध्यक्ष शरद चव्हाण, अविनाश उर्फ राजू जाधव, समीर सावंत, संजय यादव, सहचिटणीस प्रजाप माने, राहुल शिंदे, प्रकाश पाटोळे, सदस्य संजय साळवी, ऋषिकेश चव्हाण, प्रकाश सावंत, प्रमोद जाधव, चंद्रशेखर धावणे, मनोज लाखण, वैभव चव्हाण, विलास चाळके, अनंत आयरे, स्वप्ना सावंत, तिलोत्तमा खानविलकर, लिना जेधे, स्मिता दळवी यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg