loader
Breaking News
Breaking News
Foto

माणगाव तालुक्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी महिलांमध्ये भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण

वावे-दिवाळी/इंदापूर, प्रतिनिधी - गौतम जाधव : माणगाव तालुक्यात यंदाची वटपौर्णिमा शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाखाली गर्दी केली होती.हिंदू परंपरेनुसार अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिलांनी वडाच्या झाडाची विधीवत पूजा केली. यावेळी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून "सात जन्मी हाच पती लाभो" अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. पूजा, आरती आणि धार्मिक विधींमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचा संदेशही देण्यात आला. महिलांमध्ये उत्साह, आनंद आणि धार्मिक श्रद्धेचे वातावरण सर्वत्र पाहावयास मिळाले. वटपौर्णिमेच्या निमित्ताने माणगाव तालुक्यातील विविध भागांमध्ये सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक परंपरा आणि कौटुंबिक मूल्यांचे दर्शन घडले. त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा महिलांसाठी आनंदोत्सव ठरल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg