loader
Breaking News
Breaking News
Foto

गीत गायन स्पर्धेत वीर राऊळ प्रथम

ओटवणे (प्रतिनिधी) - मळेवाड कोंडूरे येथील युवा मित्रमंडळ आयोजित गीत गायन स्पर्धेत वीर वामन राऊळ याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सर्वज्ञ वराडकर याने द्वितीय क्रमांक, रुद्र स्वार याने तृतीय क्रमांक पटकाविला. तर या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम काव्या पिकुळकर आणि उत्तेजनार्थ द्वितीय कैवल्य गावडे यांनी पटकाविला. या गीत गायन स्पर्धेसाठी प्रसिद्ध भजनी बुवा निलेश मेस्त्री, पखवाज वादक किशोर सावंत, आत्माराम कवठणकर, सुरेंद्र साईल यांनी संगीत साथ केली. तर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वप्निल गोरे यांनी काम पाहिले. यावेळी युवा मित्रमंडळाचे राजू रेडकर, सुरेश नाईक, पोलीस पाटील बंटी मुळीक, प्रमोद मुळीक, सुधीर मुळीक, आल्हाद नाईक, प्रवीण नाईक, मनोहर केरकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg