loader
Breaking News
Breaking News
Foto

देवधे मणचेकरवाडी येथे गव्यांचा वाढता वावर; आंबा व काजू बागांचे नुकसान, परिसरात भीतीचे वातावरण

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी येथे गव्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. मागील आठ दिवसांपासून गव्यांच्या कळपाने परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन गव्यांच्या सततच्या त्रासामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते १० गव्यांचा कळप सतत शेतांमध्ये फिरताना दिसत आहे. या गव्यांनी आतापर्यंत सुमारे २० ते २५ आंबा आणि काजूच्या झाडांची नासधूस केली असून ऐन हंगामातच हे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा आणि रात्रीही गवे मुक्तपणे फिरत असल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. शेतकऱ्यांना आपली बाग वाचवण्यासाठी रात्रभर जागरण करण्याची वेळ आली आहे. आधीच निसर्गाच्या अवलक्षणीय बदलामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या बागायतीचे गवेही नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे वनविभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. गव्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी देवधे मणचेकरवाडी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg