loader
Breaking News
Breaking News
Foto

संविधानाशी निष्ठा , कायद्याच्या चौकटीतच भूमिका; नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबई: नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या एका भाषणावरून महाराष्ट्राचे राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता .नवी मुंबईतील सकल हिंदू समाजाच्या एका संमेलनात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ .हेगडेवार यांच्या कार्याचा गौरव केला. यावर काँग्रेससह विरोधी पक्षाने जोरदार टीका केली. सोशल मीडियावर हा विषय व्हायरल झाला होता. यानंतर सोमवारी नागरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यावर प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिले, संविधानाची निष्ठा आणि कायद्याचे चौकटीत राहूनच आपण भूमिका मांडली. त्यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले. एका सामाजिक कार्यक्रमातील भाषणावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नागरे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करीत भारतीय संविधान यातील मूल्यांची निष्ठा जपली असल्याचे सांगितले .आपण केलेले संपूर्ण भाषण कायद्याचे चौकटीत असून त्याचा विपर्यास केला, असा दावा त्यांनी केला. मी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून माझी कटिबद्धता भारतीय संविधानाशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संविधानातील मूल्यांचा मी आदर करतो, कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबर समाजात जनजागृती आणि प्रबोधन करणे हेही पोलीस विभागाचे कर्तव्य आहे ,असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेले 30 वर्षे पोलीस सेवेत कार्यरत असून रमजान ईद, इफ्तार, जैन बौद्ध ख्रिश्चन तसेच विविध समाजाचे कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. मुद्दे प्रत्येक ठिकाणी सामाजिक सलोखा ,नैतिक मूल्य आणि कायद्याचे पालन याबाबत मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg