सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय व दैदीप्यमान यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९५.४६% लागला असून विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांना यशाची भक्कम साथ मिळाली आहे. या यशामागे संस्था अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत (जिल्हा परिषद सदस्य, सिंधुदुर्ग), उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व पदाधिकारी यांचे वेळोवेळी मिळालेले प्रेरणादायी मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे. संस्थेच्या दूरदृष्टीपूर्ण विचारसरणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास व अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या अभ्यासपूर्ण, नियोजनबद्ध व प्रेरणादायी नेतृत्वामुळे शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम झाले. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या गुणवत्तेचा सर्वांगीण विकास साधण्यात आला. शाखानिहाय निकाल पाहता, विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला आहे. तन्वी वामन काणेकर (९०.१७%) प्रथम, श्रेय्या गुणाजी गवस (९०.००%) द्वितीय, सोहम सचिन सावंत (८७.३३%) तृतीय. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.९३% लागला असून दत्तराज शैलेश पई (९५.००%) प्रथम, निधी समीर साटेलकर, चिन्मय शांताराम असंकर, मनस समीर कोलाटे (प्रत्येकी ९२.१७%) द्वितीय, रिद्धी दिलीप बोभाटे (९१.८३%) तृतीय. विशेष म्हणजे बुक-कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयात रिद्धी बोभाटे व मनस कोलाटे यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. कला शाखेचा निकाल ९१.२४% लागला असून हर्षधा रामाकांत कासार हिने ९२.६७% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. यासोबतच तिने राज्यशास्त्र विषयात ९८ गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे, ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. सानिका संदीप ठाकूर (८२.६७%) द्वितीय, सृष्टी प्रविण ठाकूर (८२.००%) तृतीय.
या यशामध्ये सर्व शाखांमध्ये अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभ्यासपूर्ण, समर्पित व विद्यार्थीकेंद्री मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देत त्यांना योग्य दिशा दिली, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही आवश्यक ते सहकार्य करून शैक्षणिक प्रक्रियेला बळकटी दिली. विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि संस्थेचे प्रेरणादायी मार्गदर्शन यांचा सुंदर संगम म्हणजेच हे उज्ज्वल यश होय. या यशामुळे महाविद्यालयाचे नाव उंचावले असून सावंतवाडी परिसरातून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.



















































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.