loader
Breaking News
Breaking News
Foto

विजघर चेकपोस्ट येथून गोवा बनावटीची दारू भरलेला पिकअप चंदगड पोलिसांनी केला जप्त

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गोवा बनावटीची विविध प्रकारची सुमारे ९ लाख २४ हजार रुपये किमतीची दारू भरलेली पिकअप विजघर चेकपोस्ट येथून चंदगड पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तिलारी नगर पार्ले येथे सापळा लावून हे वाहन पकडले. दोडामार्ग तिलारी ते चंदगड या मार्गावर पार्ले (ता. चंदगड) या गावच्या हद्दीत ९ लाखांच्या ४ हजार २७२ दारूच्या बाटल्यांसह एकूण १४ लाखांचा मुद्देमाल चंदगड पोलिसांनी जप्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी संशयित आरोपी म्हणून शेखर मारुती सावंत (वय ३६, धंदा - चालक व दारू विक्री, रा. नागनवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) व किशोर अनंत लोंढे (वय ४०, धंदा - मजुरी, रा. साठेली भेडसी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग ) या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन व २० हजार रुपयांचा मोबाईल व ४ सिम कार्डही जप्त करण्यात आली आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल ऋषिराज कोरवी यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg