रत्नागिरी : पर्यटनाच्या नव्या पर्वामुळे जिल्ह्याच्या अर्थचक्राला मोठी गती निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याने आता पर्यटनाच्या क्षेत्रात कात टाकली असून, शहरात पर्यटनाची एक नवी नांदी पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत नियोजनबद्धरीत्या विकसित करण्यात आलेल्या विविध पर्यटन स्थळांमुळे केवळ पर्यटकांचा ओघच वाढला नाही, तर स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचे साधनही निर्माण झाले आहे. ज्याप्रमाणे केरळ आणि काश्मीरसारख्या राज्यांनी पर्यटनाच्या जोरावर आपली अर्थव्यवस्था मजबूत केली, त्याच धर्तीवर आता रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष पुढाकारातून शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आकारास आली आहेत. यात प्रामुख्याने शिवसृष्टी, अद्ययावत मल्टीमीडिया थ्रीडी शो, तारांगण आणि जिजामाता उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा ही मुख्य आकर्षणे ठरत आहेत.
या ऐतिहासिक आणि शैक्षणिक प्रकल्पांमुळे रत्नागिरीची ओळख केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरती मर्यादित न राहता, एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र म्हणूनही दृढ होत आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास, गेल्या वर्षभरात शिवसृष्टीला १८ ते २० हजार पर्यटकांनी पसंती दिली आहे, तर लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थान स्मारकास भेट देणाऱ्यांची संख्या आता लाखांच्या घरात पोहोचली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची ओढ जिजामाता उद्यानातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे अधिक वाढली आहे. गेल्या वर्षभरात साधारणतः ५० हजार पर्यटकांनी या उद्यानाला भेट दिली असून, पुतळ्याच्या पायथ्याशी असलेल्या 'म्युरल्स' प्रदर्शनातून महाराजांच्या जीवनाचा इतिहास जिवंत होत असल्याने पर्यटक भारावून जात आहेत.
पर्यटनाच्या या विकासामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांमुळे हॉटेल व्यवसाय, लॉजेस आणि पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. रिक्षाचालकांपासून ते खाजगी वाहनचालकांपर्यंत सर्वांच्याच उत्पन्नात वाढ झाली आहे. गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन केंद्र म्हणून आधीच प्रसिद्ध असून तेथे कोट्यवधींची उलाढाल होते; मात्र आता रत्नागिरी शहरातही अशाच सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने हे शहर भविष्यात देशातील प्रमुख पर्यटन केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटकांच्या गर्दीमुळे फिरणारे हे अर्थचक्र जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच नवी दिशा देणारे ठरेल.




















































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.